महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय सैन्याकडून घाटी रुग्णालयातील कोरोना वॉरिअर्सना मानवंदना - भारतीय सैन्याकडून घाटी रुग्णालयातील कोरोना वॉरिअर्सना मानवंदना

कोरोना सारखा आजार भीषण रूप घेत असताना डॉक्टर मोठ्या हिमतीने काम करत आहेत. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही आलो असल्याची भावना छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर यु. एस. आनंद यांनी व्यक्त केली.

Indian army salutes to contribution of doctors in corona war
भारतीय सैन्याकडून घाटी रुग्णालयातील कोरोना वॉरिअर्सना मानवंदना

By

Published : May 4, 2020, 7:50 AM IST

Updated : May 4, 2020, 2:43 PM IST

औरंगाबाद-कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र योद्ध्यांप्रमाणे सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मान व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न म्हणून लष्कराच्यावतीने रविवराी घाटीच्या परिसरात जाऊन कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. सैन्य दलातर्फे पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र यावेळी घाटीच्या अधिष्ठाता आणि डॉक्टरांना देण्यात आले. औरंगाबाद विभागात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्याबद्दल यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर यु. एस. आनंद, अजय लांबा, हरमिंदर सिंग, आर.के. सिंग या लष्कर अधिका-यांची उपस्थिती होती.

भारतीय सैन्याकडून घाटी रुग्णालयातील कोरोना वॉरिअर्सना मानवंदना

घाटीमध्ये सुरू असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचार, घाटीमध्ये देण्यात येत असलेल्या विविध सोयी सुविधा प्रयोगशाळा आदींसह विविध कामांची माहिती लष्करी अधिकाऱ्यांना दिली. घाटीच्या अधिकारी, कर्मचारऱ्यांचे आभार मानण्यात येणारी फ्रेम लष्कराच्यावतीने डॉ. येळीकर यांना भेट देण्यात आली.

कोरोना सारखा आजार भीषण रूप घेत असताना डॉक्टर मोठ्या हिमतीने काम करत आहेत. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही आलो असल्याची भावना छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर यु. एस. आनंद यांनी व्यक्त केली.

कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. लढा देत असताना समाजातून प्रोत्साहन मिळते आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या मानवंदनेमुळे या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लढण्यासाठी अधिक बळ मिळाल्याची भावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केली.

डॉ. येळीकर यांच्यासमवेत घाटीचे उपाधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ.सुधीर चौधरी, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, नवजात व शिशु विभागाचे प्रमुख डॉ.एल.एस.देशमुख, डॉ.अनिल धुळे, डॉ.अमरनाथ आवरगावकर, डॉ.सोनल येळीकर यांनीही लष्कराच्या या भेटवस्तूचा स्वीकार करत लष्करी अधिका-यांचे आभार मानले.

Last Updated : May 4, 2020, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details