औरंगाबाद -खेळ भारताची परंपरा आहे. मात्र, आपण त्यात जास्त यश मिळवू शकलो नाही. आपल्यापेक्षा लहान देश ऑलम्पिकमध्ये पदके जिंकतात. मात्र, आपण असूनही एक दोन पदांवर समाधान मानतो, अशी खंत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
2028 पर्यंत भारत पहिल्या दहा देशात येईल -
खेळ देशाला एकजूट करतो. त्यामुळे खेळाकडे विशेष लक्ष दिले पाहीजे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीकोनातून खेलो इंडिया व फिट इंडीया या कार्यक्रमांना देशभरातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्याचसोबत भारत सरकारने देशभर राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सुरु केले असून महाराष्ट्रात ३ केंद्र सुरु करण्यास भारत सरकारने मंजूर दिली आहे. औरंगाबाद, मुंबई व नागपूर येथे ही केंद्रे सुरु होणार आहे. तसेच २०२८ पर्यंत भारत ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिल्या दहा देशात असेल, असे सांगत औरंगाबादमधील या केंद्रातील १० ते १५ खेळाडू २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतील, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केला.
आशियातील पहिल्या स्टेनलेस स्टील स्विमिंग पुलचे उदघाटन -
शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या आशियातील पहिल्या स्टेनलेस स्टील निर्मित आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व सिंथेटीक हॉकी टर्फ मैदानाचे उद़्घाटन केंद्रीय राज्य क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचसोबत तलवारबाजी या क्रीडा प्रकारासाठी आवश्यक अशा सुसज्ज इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणदेखील केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद शहर अविस्मरणीय -