छत्रपती संभाजीनगर Income Tax Raid :आयकर विभागानं छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी अचानक छापेमारी केली आहे. यावेळी बांधकाम व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आलंय. आयकर विभागानं शहरात एकाचवेळी 11 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यासाठी 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम शहरात दाखल झाली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यानं ही कारवाई होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. आज सकाळी शिर्डी मार्गे जवळपास 30 ते 40 वाहनांचा ताफा शहरात दाखल झाला. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आयकर विभागानं एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमुळं शहरात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरात एकाच वेळी 11 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी, व्यावसायिकांमध्ये खळबळ - एकाचवेळी 11 ठिकाणी छापे
Income Tax Raid : आयकर विभागानं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात अचानक छापे टाकण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे शहरातील 11 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आलीय.
संग्रहित छायाचित्र
Published : Nov 30, 2023, 12:45 PM IST
|Updated : Nov 30, 2023, 12:56 PM IST
(बातमी अपडेट होत आहे.)
Last Updated : Nov 30, 2023, 12:56 PM IST