महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरात आयकर विभागाच्या दोनशे अधिकाऱ्यांचा ताफा; 20 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांवर केली छापेमारी - बांधकाम व्यावसायिकांवर केली छापेमारी

Income Tax Raid Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात एकाचवेळी 20 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Raid) केलीय. तब्बल 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही छापेमारी करण्यात आलीय. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

Income Tax Raid
20 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 10:46 PM IST

छत्रपती संभाजीनगरIncome Tax Raid Chhatrapati Sambhajinagar : प्राप्तिकर विभागाने दिवसभर शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल वीस ठिकाणी धाडी टाकल्या (Income Tax Raid) आहेत. अचानक पन्नासहुन अधिक वाहनांमध्ये दोनशे कर्मचारी दाखल झाले आणि कोणाला काही कळण्याच्याधी कारवाईला सुरुवात केली. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांना धक्का बसलाय. या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली गेली होती. अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्वाचे दस्तावेज लागले असल्याची माहिती, सूत्रांनी दिलीय. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागातर्फे ही मोठी कारवाई करण्यात आलीय.



चार व्यावसायिकांवर एकाच वेळी छापे : सकाळी अचानक शहरातील अनिल मुनोत, महेश लाभशेटवार, नितीन बगडीया, शिरीष गादीया आणि मंजित प्राईडचे राजपाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. सकाळी सहा वाजेपासून या कारवाईस सुरुवात झाली. सुरुवातील 11 ठिकाणी कारवाई झाली. त्यानंतर मिळत गेलेल्या माहितीनुसार इतर ९ ठिकाणी देखील झाडाझडती घेतली गेली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास वीस ठिकाणी ही कारवाई आठ वाजेपर्यंत करण्यात आली. या करवाईबाबात मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. आर्थिक देवाणघेवाण आणि व्यवहार यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.



दोन दिवस तरी चालेल कारवाई : शहरात बांधकाम व्यावसायिकांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प सुरू होत असताना, अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांना धक्का बसलाय. या कारवाईचा धसका बांधकाम व्यवसायिकांसह इतरांना बसलाय. ही करावाई अजून एक ते दोन दिवस चालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर आयकर विभागाने अचानक धाडी टाकताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. Petition On Income tax raid : राजकारण्यांना अशा मिळायच्या कमी दरात जमिनी; 'आयकर'कडून मध्यस्थांची नावे उघड
  2. Income Tax Raid Nashik: नाशिकमध्ये सातहून अधिक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी; 3 हजार 333 कोटींचा बेहिशेबी व्यवहार उघड
  3. आयकर विभागाकडून राज्यभर छापेमारी, मुंबईत 12 ठिकाणी छापे

ABOUT THE AUTHOR

...view details