औरंगाबाद (वैजापूर) - वैजापूर हत्याकांडात आक्रमक होत महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक लाइव्ह करत पोस्ट केली. वेदनादायी! न्याय होणारच! वैजापूर बहिणीची मुंडके कोयत्याने धडपासून वेगळे करून सेल्फी काढणाऱ्या नराधमाला फाशीच व्हावी असही त्या म्हणाल्या आहेत. ( Honour killing Vaijapur taluk of Aurangabad district. ) आई वडिलांनी पोटचा गोळा क्रूरपणे मारण्याला हातभार, समाज म्हणून आपणही या विषयाला जबाबदार आहोत? मुलीचा पती व कुटुंब, सामाजिक संघटना, प्रशासन यांच्या सहकार्याने मी ही केस वकील म्हणून फक्त १/- रुपये मानधनात लढण्यास तयार आहे असही त्या म्हणाल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय कीर्ती थोरेने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री