औरंगाबाद- मराठवाड्यात चार नवीन औद्योगिक वसाहती तयार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादच्या 'महाएक्स्पो'च्या उद्घाटन प्रसंगी दिली. यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड येथे या वसाहती निर्माण केल्या जाणार असल्याचे देसाई म्हणाले.
'महाराष्ट्र महाएक्स्पो 2020'चे उद्घाटन ; मराठवाड्यात होणार चार नव्या औद्योगिक वसाहती - Maharashtra MahaXpo 2020
मराठवाड्यात कापूस उत्पादकता अधिक आहे. त्यामुळे कापूस उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांचा विस्तार करण्यासाठी उस्मानाबादला टेक्निकल हब तयार करण्यात येणार आहे. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई यांची निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. पालकमंत्री म्हणून मोठी जबाबदारी असल्याचे सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत सांगितले.
हेही वाचा-दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण
मराठवाड्यात कापूस उत्पादकता अधिक आहे. त्यामुळे कापूस उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांचा विस्तार करण्यासाठी उस्मानाबादला टेक्निकल हब तयार करण्यात येणार आहे. औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई यांची निवड करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. पालकमंत्री म्हणून मोठी जबाबदारी असल्याचे सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत सांगितले. मराठवाड्यात अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक वासहतीसह चार नव्या वसाहती निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये शेंद्रा जयपूर सटाणा परिसरात 1018 हेक्टरवर एमआयडीसी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच बरोबर 8360 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात वडगाव सिद्धेश्वर, नांदेड कृष्णूर येथे औद्योगिक वसाहत आणि जालना येथील ड्रायपोर्ट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी औरंगाबादच्या 'महाराष्ट्र महाएक्स्पो 2020' या कार्यक्रमात जाहीर केले.