औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील धोत्रा शिवारात शेतातील घर व गोठ्यास आग लागून 15 शेळ्या मरण पावल्याअसून शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखापर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील धोत्रा गाव शिवारात राजेंद्र अमरसिंग जाधव व गजानन अमरसिंग जाधव यांच्या शेतात घरास व गोठ्यास रात्री अचानक आग लागून 10 ते 15 शेळ्या मरण पावल्या असून दोन बैल जखमी झाले आहेत. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीसाहित्य, खते, औषधी, 15 क्विंटल धान्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे दोन्ही शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखापर्यंत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.