छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : संतांची नगरी अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात नाथ षष्ठीची परंपरा शेकडो वर्षांपासून आजही कायम आहे. पैठण येथे एकनाथ षष्ठीला दहीहंडी फोडून प्रसाद स्वरूपात काला वाटण्याचे प्रथा आहे. तसीच प्रथा शहरातील औरंगपुरा भागातील नाथ मंदिरात पार पडली जाते. प्रती पैठण म्हणून या भागाची ओळख इतिहास काळापासून आहे, त्यामुळे दहीहंडीनिमित्त मंदिर परिसर भक्तीमय झाल्याचे पाहायला मिळतय.
नाथ महाराजांचे वास्तव असल्याने आहे वेगळे महत्त्व :संत एकनाथ महाराज यांचे पैठण येथे मोठे मंदिर आहे. दरवर्षी लाखो वारकरी - भाविक नाथ महाराजांच्या दर्शनासाठी नित्य नियमाने येत असतात. त्यांच्या पादुका त्या भागात नाथ मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्या दोन पादुका असून त्यातील एक पादुका औरंगपुरा भागातील नाथ मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराला प्रती पंढरपूर असह म्हणलं जात. असं म्हणतात की एकनाथ महाराज पैठणून सुलीभंजन येथे दत्ताचे दर्शन घेण्यासाठी जात असताना ते औरंगपुरा येथील नाथ मंदिरात वास्तव्यास असायचे. रात्री भजन, कीर्तन देवाचे नामस्मरण करून ते सकाळी मार्गस्थ व्हायचे. परत येताना पुन्हा ते नाच मंदिर परिसरात वास्तव्यास असायचे. त्यामुळे त्या भागात संत एकनाथ महाराजांचे चरण स्पर्श झाल्या असल्याने प्राचीन काळापासून वाडा आहे. त्या ठिकाणी दरवर्षी नाथ षष्ठीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो अनेक भाविकांना पैठण येथे जाणं शक्य होत नाही, त्यामुळे औरंगपुरा येथे असलेल्या मंदिरात भाविकांसाठी सोहळा ठेवला जातो आणि त्याला हजारो भावीक दर्शनासाठी येतात अशी माहिती मंदिर विश्वस्त लक्ष्मण थोरात यांनी दिली.