औरंगाबाद -राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. औरंगाबादमध्ये आढळलेल्या 21 वर्षीय तरुणाचे आणि 55 वर्षीय महिला या दोन रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण; पुणे, दिल्लीतून होते परतले
औरंगाबादमध्ये दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधितामध्ये एक पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. त्यातील एक जण दिल्लीहून आला होता तर एक जण पुण्याहून आले होते. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी हे दोघे दिल्ली, पुण्याहून हे शहरात दाखल झाले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या या दोघांना सर्दी, ताप, खोकला असल्याने दोघांची तपासणी करण्यात आली. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले होते. अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा तपासण्यासाठी पुण्याला पाठवण्यात आला होता. या दोनही रुग्णांना तीव्र संशयित मानले जात होते. या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह असण्याची शक्यता वर्तवली जात होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संशय खरा ठरला आणि दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
दोनही रुग्णांवर औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. 21 वर्षीय तरुण आरेफ कॉलनीत राहत असून तो पुण्याला खासगी नोकरीला आहे. तर सिडको भागातील 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून या महिलेचा पती दिल्लीहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर आढळून आलेले दोनही रुग्ण कोणा-कोणाला भेटले याबाबत माहिती घेण्यात येत आहे.