महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा द्या - इम्तियाज जलील - harshawardhan jadhav

विधानसभा निवडणुकीत कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा द्या, असे जाहीर आवाहन एमआयएमकडून करण्यात आले आहे.

खासदार इम्तियाज जलील

By

Published : Oct 19, 2019, 3:42 PM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा द्या, असे जाहीर आवाहन एमआयएमकडून करण्यात आले आहे. एमआयएमच्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर सभेत मतदारांना आवाहन केले.

खासदार इम्तियाज जलील

शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. असा आरोप करत जाधव यांना मुसलमानांची औलाद असे हिनवत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. एमआयएम स्वतःच्या ताकदीवर निवडुन आली असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. तसेच शिवसेना अस हिनवत असेल तर हर्षवर्धन जाधव यांनाच मतदान करा, असे आवाहन जलील यांनी जाहीर सभेत केले.

हेही वाचा - भारतरत्न द्यायचेच असेल तर सुखदेव, भगतसिंग, अश्फाक उल्ला खान यांना द्या - ओवेसी

हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत आमदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे तो युवक आणि चांगला आमदार आहे. अभ्यासू असल्याने अशा माणसाच्या मागे उभे राहिले पाहिजे, म्हणून आम्ही पाठिंबा देत असल्याचे जलील यांनी सांगितले.

हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांना 'ते' विधान भोवले; आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details