छत्रपती संभाजीनगर :मी आजही औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करत आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला देत आहात, तर माझे काही प्रश्न आहेत. औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा काय संबध होता ते सांगा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून किंवा मी खासदार म्हणून नाही तर सामान्य माणूस म्हणून नाव बदलाला विरोध करत आहात त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवत आहेत, चर्चा करून त्याबाबत जाहीर माहिती देऊ अशी घोषणा एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
इतर शहरांची नाव बदला : इतर शहरांची नावे बदला : शौर्यावरून जर तुम्ही नाव बदलत असाल तर कोल्हापूरचे नाव बदलून ते छत्रपती शाहू नगर ठेवा. पुण्याचे नाव बदलून फुलेनगर करा. नसेल तर पुणेच्या जागी फुले करा. नागपूर शहराचे नाव बदलून ते डॉ बाबासाहेब नगरी ठेवा. मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजनगर करा. मालेगावचे नाव मौलाना आबाद करा अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. बाळासाहेब ठाकरे येथे आले आणि राजकारणाचे दुकान चालवणे सुरू केले. होती. महाराष्ट्रात औरंगाबाद तुम्हाला जमत नाही. परंतु बिहार येथील औरंगाबाद कस चालेल, त्या बिहार औरंगाबादचा खासदार हा भाजपचा, मग ते नाव का बदलत नाहीत. असे संतप्त प्रश्न इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थितीत केले.