महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Imtiaz Jaleel On Patsanstha : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा; खातेदारांना घेऊन खासदार जलील यांचा मोर्चा

औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आता गरजेच्यावेळी हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या ग्राहकांना घेऊन खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढला आहे.

Adarsha Nagri Sahakari Patsanstha
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था

By

Published : Jul 17, 2023, 5:28 PM IST

माहिती देताना खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : आदर्श नगरी बँकेत झालेल्या अपहारमुळे अनेक गोरगरिबांचे पैसे अडकले आहेत. गरजेच्या वेळी हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या ग्राहकांना घेऊन खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढला. क्रांती चौक ते पोलीस आयुक्तालय असा हा मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत गोरगरिबांचे पैसे मिळणार नाही, तोपर्यंत आपण लढू असा इशारा खासदार जलील यांनी दिला.



खासदार जलील यांनी काढला मोर्चा: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटीहून अधिकची रक्कम कर्ज म्हणून वाटप करण्यात आली. त्यात कर्जदारांचे दस्तावेज, तारण किंवा गॅरेंटर ह्या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत. परिणामी कर्ज परत न मिळाल्याने अनेकांच्या ठेवी मुदत पूर्ण होऊनही मिळत नव्हत्या. त्यावर बँकेचे ऑडिट झाल्यानंतर सिडको पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. ठेवीदारांनी बँकेसमोर गर्दी करायला सुरुवात केली. खासदार इम्तियाज जलील यांनी खातेदारांसह बँकेत जाऊन पैसे परत कधी मिळणार याबाबत जाब विचारला. त्यावेळी लोकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती. सोमवारी दुपारी बारा वाजता क्रांती चौक ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा त्यांनी काढला, यात बँकेच्या ग्राहकांनी सहभाग नोंदवत पैसे परत द्या अशी मागणी केली.



पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन: आंदोलनामध्ये खासदार इम्तियाज जलील आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत ठेवीदार आणि खातेदार यांचे पूर्ण पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सहकार क्षेत्राचे नाव राज्यात बदनाम होत आहे. आदर्श बँक, त्याआधी सारस्वत बँक आणि अशा कित्येक पतसंस्था अशाच बंद पडल्या. या सर्व बँकांमध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा पैसा अडकलेला नाही, तर सर्वसामान्य, गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्या लोकांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे आता अधिवेशन सुरू झाले आहे. यात पैसे कधी देणार याबाबत स्पष्ट घोषणा करावी अशी मागणी, खासदार इम्तियाज जलील यांनी केली.



ठेवीदारांची बँकेसमोर गर्दी: मगील आठवड्यात सिडको पोलिसात आदर्श पतसंस्थेच्या संचालक मंडळासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ठेवीदार आणि खातेदार यांनी बँकेसमोर रोजच गर्दी करायला सुरुवात केली. पैसे कधी मिळणार याबाबत रोज चिंता ग्राहकांना लागली आहे. दरम्यान संचालक अंबादास मानकापे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा -

  1. Adarsh Bank 200 Crore Scam: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील काढणार ग्राहकांसाठी काढणार निषेध मोर्चा
  2. Asasuddin Owaisi : विरोधकांचा आमच्यावर विश्वास आहे का? विरोधी पक्षाच्या बैठकीला न बोलावल्याने ओवेसी नाराज
  3. Imtiaz Jalil Allegation : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चालते 20 टक्के कमीशनखोरी; खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details