औरंगाबाद - एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे जलील यांनी सांगितले. यावेळी जलील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जलील हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून इम्तियाज यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली. यावेळी जलील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सध्याचे खासदार चंद्रकांत खैरै यांचा पराभव करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील भडकल दरवाजा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोठी प्रचाररॅली काढत इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला