औरंगाबाद - कारमधुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या दोघांकडून पोलिसांनी ६३ हजारांच्या गुटख्यासह कार असा सुमारे 1 लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश यांनी दिली आहे.
कारमधून गुटखा विक्री; 1 लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त - आझाद चौक
कारमधुन अवैधरित्या गुटख्याचीवाहतूक करणाऱ्या दोघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या दोघांकडून पोलिसांनी ६३ हजारांच्या गुटख्यासह कार असा सुमारे 1 लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश यांनी दिली आहे.
मोहम्मद अस्लम मोहम्मद मोअजम (वय ३५, रा. गुलाबशाह कॉलनी, खुलताबाद) आणि शेख मोइनोद्दिन शेख अहेमोद्दीन (वय २६, रा. शुलीभंजन ता. खुलताबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कारमधुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक प्रशांत अजिंठेकर आणि जिन्सी पोलिसांनी रोशनगेट ते आझाद चौक रस्त्यावर सापळा रचून कार (एमएच २एपी २७१२) अडवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये ६३ हजार रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा मिळाला. याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे अन्न निरीक्षक प्रशांत अजिंठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.