औरंगाबाद - कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असून गेल्या चार दिवसांपासून रोज दोनशेहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी दिवसभरात 275 नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 49566 इतकी झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी 72 जणांना (मनपा 50, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46793 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1511 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
नव्याने चार कोरोनाबाधितांचा मृत्यू -