महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ice Stock Competition : राष्ट्रीय आइस स्टॉक स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता, छ. संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी - ice stock competition winners

Ice Stock Competition : आइस स्टॉक खेळात (Ice stock sport) महाराष्ट्रानं आपला दबदबा कायम ठेवला आहे. पुणे येथे दुसऱ्या राष्ट्रीय समर आइस स्टॉक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पहिला क्रमांक गुजरात, दुसरा क्रमांक महाराष्ट्रानं तर तिसरा क्रमांक राजस्थाने पटकावला (Ice stock competition winners) आहे.

Ice Stock Competition
राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 4:49 PM IST

Updated : Oct 14, 2023, 5:04 PM IST

छत्रपती संभाजीनगरIce Stock Competition : राष्ट्रीय आइस स्टॉक स्पर्धेत (Ice stock sport) महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवलाय. महाराष्ट्र संघानं ३ सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदक जिंकली आहेत. यात वीस राज्यातील ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात पहिला क्रमांक गुजरात, दुसरा क्रमांक महाराष्ट्रानं तर तिसरा क्रमांक राजस्थाननं पटकावला (Ice stock competition winners) आहे. त्यात (Chhatrapati Sambhajinagar News) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायकवाड ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी राज्यासाठी १० रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे. या कामगिरीनंतर महाराष्ट्र आईस स्टॉक संघटना अध्यक्ष महेश राठोड (Mahesh Rathod) आणि संघटना सचिव अजय सर्वोदय (Ajay Sarvoday) यांनी सर्व खेळाडूंचं अनिभनंदन केलं. तर यापुढे राज्यातील खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र ठरला उपविजेता : पुणे येथे दुसऱ्या राष्ट्रीय समर आइस स्टॉक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आइस स्टॉक हा खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक मान्यता प्राप्त खेळ आहे. हा खेळ हिवाळी ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो. तर, उन्हाळी व हिवाळी असे २ प्रकार यात असून खेलो इंडिया स्पर्धेत (Khelo India Youth Games) तसंच ऑल इंडिया पोलीस गेम स्पर्धेत या खेळ प्रकाराला समाविष्ट करण्यात आलं आहे. वैयक्तिक आणि सांघिक खेळ अशा २ प्रकारात हा खेळला जातो. या खेळात टीम गेम, टीम डिस्टन्स, टीम टार्गेट असे प्रकार असतात. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल (Balewadi Krida Sankul) येथे ही स्पर्धा पार पडली.



संभाजीनगर मधील खेळाडूंची सरशी : आइस स्टॉक खेळ प्रकारात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संभाजीनगरच्या गायकवाड ग्लोबल शाळेतील ८ खेळाडूंनी सांघिक खेळात सहभाग नोंदविला होता. यामधे १० रौप्य व ४ कांस्य पदकची कमाई खेळाडूंनी केली. यासाठी प्रशिक्षक प्रणव तारे यांची मार्गदर्शन केल्यानं यश मिळवता आल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.

रौप्य पदक विजेते खेळाडू :१) प्रतीक्षा डव्हळे, २) हर्षल डव्हळे, ३)भाग्येश हवळे, ४) नुमान शेख ५) इशांत देशपांडे, ६) वेदांत साळवे


कांस्य पदक विजेते : १) मेधावी फुटाणे २) आर्यन जैवाल



असा असतो खेळ :आइस स्टॉक हा खेळ प्रकार अतिशय वेगळा आहे. यामधे एका दांड्याला लावलेल्या लोखंडी थाळी असलेल्या वजनदार स्टॉकला थ्रो करावा लागतो. हा खेळ खेळताना टीम गेम म्हणजे लांबपर्यंत स्टॉक ढकलणं, टीम डिस्टन्समध्ये एका विशिष्ठ ध्येय म्हणजे टार्गेट पर्यंत स्टॉक ढकलणे, टीम टार्गेट मध्ये एका खेळाडूच्या पुढे आपला स्टॉक पोहचवणे अशा प्रकारात हा खेळला जातो. या स्टॉकचं वजन अंदाजे ५ - ८ किलो असतं. ताकदीने स्टॉक फेकून कामगिरी करावी लागते. यासाठी सराव आणि मन एकाग्र असण्याची आवश्यकता असते असं मत प्रशिक्षक प्रणव तारे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Prasiddhi Kamble : स्पेशल चाईल्ड असल्याने लोकांनी नावं ठेवली, पण पोरीने नाव काढलं, Olympics मध्ये 'सुवर्ण'कामगिरी
  2. Bodybuilding Competition : टॅक्सीचालकाच्या मुलीने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पटकावला क्रमांक, ऑलिंपिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत गाण्याचे स्वप्न
  3. Amravati News : दिव्यांगत्वावर मात करून अब्दुल झाला बॉडी बिल्डर; अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जिंकली पदके
Last Updated : Oct 14, 2023, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details