औरंगाबाद - गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या बाबतीत विधानसभेत केलेल्या विधानानंतर, त्यांना राज्यातून वेगवेगळ्या शिक्षकांचे जाब विचारणारे फोन येत असल्याचे समोर आले आहे. Threat to MLA Prashant Bomb इतकेच नाही तर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील शिक्षकांकडून देण्यात येत आहे. दोन दिवसांत तब्बल तीन हजारहून अधिक फोन त्यांना आल्याचे प्रशांत बंब यांनी सांगितले आहे.
मी घाबरणार नाहीशिक्षकांच्या बाबतीत माझ्याकडे असलेली माहिती त्या आधारे मी वक्तव्य केलेल आहे. मला गेल्या दोन दिवसांमधून अनेक धमक्यांचे फोन केले येत आहेत. मात्र, मी अशा धमक्यांना घाबरणार नाही असे मत आ. प्रशांत बंब यांनी व्यक्त केले आहे. माझ्याकडे मी केलेल्या वक्तव्याबाबत सबळ पुरावे आहेत. मला विधानसभेत फक्त पाच मिनिटं बोलण्यासाठी मिळाले. मात्र, अधिकचा वेळ मिळाला असता तर मी निश्चित अजून माहिती सादर केली असती. मात्र, वेळ कमी असल्याने मोजकीच माहिती मी मांडली.