महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दागिने विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीचा हत्या - aurangabad crime news

पत्नीने घरात ठेवलेले दागिने न सांगता विकले.यावेळी पती पत्नी मध्ये भांडणं झाले.पतीने रागाच्या भरात पत्नीला दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी आरोपीला दिऊ दमण येथून अटक केली आहे.

husband kills wife over jewelery sale in aurangabad
दागिने विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीचा हत्या

By

Published : Mar 15, 2021, 11:43 AM IST

औरंगाबाद - पिसादेवी येथील विवाहितेच्या हत्येचे रहस्य उलगडले असून पत्नीला न विचारता तिचे दागिने विकल्यावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात व्यायामाच्या डंबेल्स आणि दगडाचे ठेचून निर्घृण हत्या केल्याचे पुढे आले आहे. दिवदमन या केंद्रशासित राज्यातून त्याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली. सिद्धेश गंगाधर त्रिवेदी (35) रा. रुख्मिनी अपार्टमेंट, पिसादेवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या -

आरोपी सिद्धेशने तिची पत्नी कविता त्रिवेदी (30) हिने कपाटात ठेवलेले दागिने न विचारता विकले. या कारणावरून 17 फेब्रुवारी रोजी पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. दरम्यान आरोपी सिद्धेशने व्यायामाच्या डंबेल्सने कविताच्या डोक्यावर वार केले. तसेच तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने घराचा दरवाजा बाहेरून लावून तो घटनास्थळावरून पसार झाला. रात्रभर मुलगा आणि मुलगी अशी दोन्ही चिमुकले रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ रडत होते. शेजाऱ्यांच्या सतर्कतेने हा प्रकार समोर आला. तेंव्हापासून पोलीस सिद्धेशचा शोध घेत होते. चिकलठाणा पोलिसांनी त्याला दिवदमण येथून अटक केली. पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता न विचारता सोन्याचे दागिने विकल्यावरून वाद झाल्यानंतर पत्नीची हत्या केल्याचे त्याने कबूल केले.

हेही वाचा - वचपा काढला! इंग्लंडला दणका; मालिकेत १-१ बरोबरी, दुसऱ्या टी-२०त भारताचा ७ गडी राखून विजय

ABOUT THE AUTHOR

...view details