महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा आवळून हत्या; - Sachin Jire

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगर येथील पवननगर भागात उघडकीस आली आहे.

ममता लाखंडे

By

Published : Jul 20, 2019, 9:57 PM IST

औरंगाबाद- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगर येथील पवननगर भागात उघडकीस आली. ममता आनंद लोखंडे, असे मृत महिलेचे नाव असून आनंद लोखंडे, असे आरोपी पतीचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड

काही दिवसांपूर्वी मृत ममता ही बेपत्ता झाली होती. ती नाशिक येथे भेटली. त्यावेळी तिच्यासोबत घराजवळ राहणार एक तरुण होता. हे पाहून पती आंनदला राग अनावर झाला होता. त्याने त्या तरुणास मारहाण करून ममताला पुन्हा घरी आणले होते. त्या नंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडायचे.

शनिवारी सकाळी दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वाद निवळला मात्र आनंदच्या डोक्यात त्याचा राग होता. त्याने मूल शाळेत गेल्यावर ममताचा दोन्ही हातानी गळा आवळून तिची हत्या केली. एवढेच नाही तर ती मृत झाल्याची शहनिशा करण्यासाठी त्याने पुन्हा पायाने ममताचा गळा आवळला. ममता मृत झाल्याची खात्री होताच त्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून चारित्र्याच्या संशयावरून ममताचा हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details