औरंगाबाद -विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गीतांजली रमेश नवथर (35,रा.गोदावरी कॉलनी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दुकान टाकण्यासाठी माहेरहुन चार ते पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी आरोपी पती करत होता. विवाहितेच्या मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे..
हे ही वाचा -हिंगोली: हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला मारल्याचा आरोप; आई-वडिलांसह ग्रामस्थांचे उपोषण
दुकान टाकण्यासाठी माहेराहून चार ते पाच लाख रुपये घेऊन ये. अशी मागणी आरोपी पती करीत होता. आरोपी मृत गीतांजलीचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करीत होते . शेवटी पैसे आणण्यास नकार दिल्याने शुक्रवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास पती रमेश निवृत्ती नवथर याने गीतांजलीच्या अंगावर रॉकेल टाकून सासू कमलबाई हिने आग लावली . यात गीतांजली गंभिररीत्या भाजल्याने तिला उपचारासाठी पैठणच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने गीतांजलीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती, सासु, नणंद व दीर या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा -औरंगाबादेत विवाहितेला जिवंत जाळले; कारण काय तर, मुलगी झाली...