औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के लागला आहे.
बारावीची परीक्षा मंडळाच्या वतीने १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारीमुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी विलंब झाला होता. बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. परंतु आता अखेर गुरुवारी परीक्षा मंडळाच्या वतीने निकाल जाहीर करण्यात आला.
औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला आहे. विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यातून १ लाख ६४ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यापैकी १ लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १ लाख ४४ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून ९२.१३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे प्रमाण हे 85.66 टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.७७ टक्क्याने अधिक आहे.
विभागाची टक्केवारी
-औरंगाबाद - ८७.७६
बीड - ८८.८३
परभणी - ८४.६६
जालना - ९०.७२