महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेवा संस्थेने पळशी बुद्रुक येथे केले होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप - aurangabad corona cases today

कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हावी यासाठी पळशी बुद्रुक गावातील नागरिकांना सेवा संस्थेच्या वतीने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1569 वर पोहोचली आहे.

homeopathy tablets distribute to citizens
नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

By

Published : Jun 1, 2020, 2:47 PM IST

कन्नड़(औरंगाबाद)- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रतिकारक्षमता चांगली असणे आवश्यक आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील पिशोर येथून जवळच असलेल्या पळशी बुद्रुक येथील नागरिकांना सेवा संस्थेच्यावतीने रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठीच्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

पळशी बुद्रुक गावातील प्रत्येक घरातील नागरिकांना सेवा संस्थेचे उपाध्यक्ष मुबीन पटेल यांच्यावतीने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. रामनगर जवळील हनुमाननगर येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर परिसरात सतर्कता घेण्यात येत आहे.

होमिओपॅथी गोळ्यांच्या वाटपावेळी मुबीन पटेल, माजी सरपंच हरिभाऊ थोटे, रहेमान पटेल, गोविंद माळी, रावसाहेब माळी, अयुब शेख, शाहरुख शेख, बाळू आधाने, भूषण जाधव, अनिस पटेल, मोसीन शेख, समशेर शेख, अतिक शेख,आयाज पटेल, कृष्णा दुसारीया, हर्षवर्धन गायकवाड आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1569 इतकी झाली आहे. यापैकी 1029 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 72 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 468 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details