औरंगाबाद :लव्ह जिहाद (Love Jihad Aurangabad) प्रकरणात अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना लग्नासाठी मुस्लिम बनवले असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले; मात्र औरंगाबादेत एक वेगळेच प्रकरण पुढ आले आहे. यामध्ये मुस्लिम मुलीचे एका हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध (Muslim girl affair with Hindu boy) होते. त्यातून लग्नापूर्वी मुलाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण (refusal convert to Islam and beating) केल्याचा (Hindu boy brutally beaten by Muslim girl family ), कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप केला आहे. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. पाहूयात काय आहे प्रकार... Latest news from Aurangabad, Aurangabad Crime
मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून खोट्या तक्रारी -औरंगाबादेत राहणारा दीपक सोनवणे, बीई मेकॅनिकल इंजिनीअर आहे. 2018 मध्ये त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुस्लिम तरुणीशी त्याची ओळख झाली होती. यातून दोघांचे प्रेम झाले. 2020-21 दरम्यान त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला; मात्र मुलींच्या घरच्यांनी याबाबत मुलाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातली. मुलाने नकार दिला आणि त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अतोनात छळ सुरू केल्याचा आरोप या तरुणाने केलाय. त्याला त्याच्या घरातून उचलून नेत दोन दिवस डांबून ठेवले, मुलीच्या वडिलांनी अतोनात मारले. इतकेच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांचाही अनन्वित छळ केला. मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून खोट्या तक्रारी पोलिसात देऊन आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकले असल्याचा आरोप या मुलाने केला आहे.