औरंगाबाद - गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळवाडा अशी ओळख मिळालेल्या मराठवाड्यात पावसाने यंदा जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यात औरंगाबादने सरासरी ओलांडली असून जवळपास सरासरीच्या 120 टक्के पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस - औरंगाबाद पाऊस बातमी
दरवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतो. काही ठिकाणी प्यायलादेखील पाणी मिळत नाही. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सतत 20 दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे, तर मराठवाड्यातील धरणांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
दरवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असतो. काही ठिकाणी प्यायलादेखील पाणी मिळत नाही. मात्र, यंदा जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सतत 20 दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे, तर मराठवाड्यातील धरणांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. औरंगाबादच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 85 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. वरून आदेश आल्यावर धरणांचे दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती अभियंत्यांनी दिली. पडलेल्या पावसाचा काही भागात शेतीला चांगला फायदा झाला, तर सखल भाग असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जास्त पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या कृषी विभागाने दिली.