महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विवाह करू इच्छिणाऱ्या कुटुंबियांना कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा मदतीचा हात

आपल्या लाडक्या मुलीचा विवाह करण्याची इच्छा प्रत्येक वडिलांची असते. त्यासाठी त्यांनी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. मात्र कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला, व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यात घरात असलेल्या तरुण मुलीचा विवाह करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती खालावल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे मोफत विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Helping hand of Kulswamini Pratishthan aurangabad
विवाह करू इच्छिणाऱ्या कुटुंबियांना कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा मदतीचा हात

By

Published : Jul 14, 2021, 8:35 AM IST

औरंगाबाद - कोरोना काळात आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक कुटुंबियांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह स्थगित केले आहेत. मात्र अशा कुटुंबियांना मदत व्हावी याकरीता कुलस्वामिनी प्रतिष्ठान आणि मंगल कार्यालय यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजू 11 कुटुंबियांचे मोफत विवाह केले जातील अशी माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली आहे.

विवाह करू इच्छिणाऱ्या कुटुंबियांना कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा मदतीचा हात

30 आणि 31 तारखेला होणार मोफत विवाह -

आपल्या लाडक्या मुलीचा विवाह करण्याची इच्छा प्रत्येक वडिलांची असते. त्यासाठी त्यांनी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. मात्र कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला, व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यात घरात असलेल्या तरुण मुलीचा विवाह करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती खालावल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे मोफत विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 30 आणि 31 जुलै रोजी मोफत विवाह करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गराजवंतांनी संपर्क करावा असे आवाहन अलका कोरडे यांनी केले आहे.

सर्व सुविधा असणार मोफत -

कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे कोविड नियमांचे पालन करून पन्नास लोकांच्या परवानगी घेऊन विवाह करून देण्याचे जाहीर केले आहे. यात मंगल कार्यालय, चहा, नाष्टा, भोजन, हार, पूजा विधीचे साहित्य, गुरुजी यांच्यासह विवाहासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. विवाहासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची संख्या मर्यादित असावी याकरीता पन्नास लोकांसाठी विशेष कार्ड कुटुंबियांना देण्यात येईल. विवाहास निमंत्रित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी कार्ड दाखवल्यावर त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जेणे करून कोविड नियमांचे उल्लंघन होणार नाही, आणि अनावश्यक गर्दी टाळणे सोपे होईल असे मत कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सदस्य विलास कोरडे यांनी व्यक्त केले.

सर्व धर्मीय विवाह सोहळा होणार -

मोफत विवाह सोहळा करण्याचे नियोजन करत असताना सर्व धर्मीय विवाह सोहळे करण्यात येणार आहेत. प्रत्येक धर्माच्या विधी नुसार विवाह केले जाणार आहेत. आतापर्यंत एका मुस्लिम समुदायातील जोडप्याने विवाहासाठी नोंदणी केली आहे. त्याचा त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केले जातील अशी माहिती अलका कोरडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details