महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याची अफवा; परीक्षार्थींचा उडाला गोंधळ - औरंगाबाद आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका लीक अफवा

राज्यात आरोग्य विभागातीन अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी विभागाच्यावतीने रविवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र, औरंगाबादेत प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा उडाल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला.

Exam
परीक्षा

By

Published : Mar 1, 2021, 8:06 AM IST

औरंगाबाद -राज्यात आरोग्य विभागाच्या विविध रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र, औरंबादमध्ये परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा उडाली. त्यामुळे सिडकोतील धर्मवीर संभाजी विद्यालयातात असलेल्या केंद्रावर परीक्षार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी व्यवस्थापनाला जाब विचारत गोंधळ घातला. यावेळी सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे सांगत आरोग्य विभागाने परीक्षार्थींना परीक्षा देण्याचे आवाहन केले
प्रश्नपत्रिका बाहेर आल्याची अफवा -

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने तीन हजाराहून अधिक जागांसाठी औरंगाबाद शहरातील ३५ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. खडकेश्वर येथील परीक्षा केंद्रावर ही प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरल्याने गोंधळ निर्माण झाला. तर, दुपारच्या सत्रात तीन वाजता होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना दोन वाजताची रिपोर्टिंग वेळ देण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळ होऊन गेली तरी प्रश्नपत्रिकाच केंद्रावर आल्या नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली. साडेतीन वाजेपर्यंत परीक्षार्थींनी वाट पाहिली. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला विचारणा करत गोंधळ घातला.


प्रश्नपत्रिकांच्या लिफाफ्याचे सील उघडे कसे -

एका खासगी वाहनाने उशिरा का होईना प्रश्नपत्रिकांची पेटी आली. मात्र, त्यातील लिफाफ्याचे सील उघडे असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. शहरातील धर्मवीरसंभाजी विद्यालय, संत मौरा, स.भु. महाविद्यालय, चिकलठाणा येथील परीक्षा केंद्र, मौलाना आझाद, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर सारखीच परिस्थीती होती. परीक्षार्थींच्या गोंधळामुळे केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. त्यानंतर ४ वाजून १८ मिनिटांनी पेपर सुरू करण्यात आला.

आरोग्य विभागाकडून सारवासारव -

या प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला आहे. नवीन कार्यप्रणाली असल्याने विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे काहीही होणार नाही. परिक्षार्थींची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

नागपुरातही उडाला गोंधळ -

औरंगाबादप्रमाणेच नागपूरमध्ये देखील काही परीक्षार्थींनी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप केला आहे. नागपूरच्या जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजातील केंद्रावर हा प्रकार झाला. परीक्षार्थींनी व्हिडिओ काढून प्रश्नपत्रिकांचे लिफाफे सील नसल्याचे सोशल मीडिवर सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details