औरंगाबाद - मी पण हिंदूच आहे त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मला मतदान करा, असे आवाहन शिवस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. टिव्ही सेंटर येथे आयोजित सभेत जाधव बोलत होते. यावेळी हर्षवर्धन जाधवांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार खैरेंवर जोरदार टीका केली.
'हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मला मतदान करा; मी पण हिंदूच आहे' - Loksabha Election
मी पण हिंदूच आहे त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मला मतदान करा, असे आवाहन शिवस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि औरंगाबाद लोकसभेचे अपक्ष उमेदवार आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. यावेळी जाधवांनी खैरेंवर जोरदार टीकाही केली.
खासदार खैरेंनी २० वर्षात जेवढे मंदिरांचे सभामंडप बांधले नाही तेवढे मी बांधले आहे. जर कोणाला असे वाटत असेल की माझ्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होणार तर त्यांना मला एकच सांगायचे आहे मी देखील एक हिंदूच आहे. त्यामुळे मला मतदान करा, असे म्हणत मराठात्तेर हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. हर्षवर्धन जाधव मागील काही दिवसांपासून विद्ममान खासदार चंद्रकांत खैरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. खैरे यांचे या निवडणुकीत डिपॉझिटदेखील जप्त होणार आहे. शांतिगिरी महाराजांना देखील हेच वाटते त्यामुळे त्यांनी चंद्रकांत खैरेंना पाठिंबा न देता मला पाठिंबा दिला. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना जाधव म्हणाले की, जलील हे निवडून येणे शक्य नाही. औरंगाबादेत एकही चांगला उमेदवार नाही त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचेही जाधव म्हणाले.