महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Harshvardhan Jadhav Joins BRS Party : हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल, जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात सामील झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात किंवा कन्नड मतदार संघात सभा घेणार अशी माहिती जिल्ह्याचे समन्वयक गुलाम अली यांनी दिली.

Harshvardhan Jadhav Joins BRS Party
हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल

By

Published : Mar 23, 2023, 3:54 PM IST

Updated : Mar 23, 2023, 4:31 PM IST

हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल, जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार

छत्रपती संभाजीनगर :कन्नड मतदारसंघात दोनवेळा आमदार असलेले हर्षवर्धन जाधव आता बीआरएस पक्षात दाखल झाले. हैदराबाद येथे जाऊन तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. समाज माध्यमांवर याबाबत फोटोंसह माहिती देण्यात आली.

वेगळे आव्हान प्रस्थापित पक्षांना देण्याची शक्यता :आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगळे आव्हान प्रस्थापित पक्षांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने तयारी सुरू असल्याची माहिती जिल्ह्याचे समन्वयक गुलाम आली यांनी दिली. येणाऱ्या काही दिवसात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा घेण्यात येईल. या सभेत इतर पक्षातील काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती देखील गुलाम अली यांनी दिली.


हर्षवर्धन जाधव दोनवेळा होते आमदार :हर्षवर्धन जाधव हे भाजप नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नंतर शिवसेनेच्या वतीने दोन वेळेस आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांची कारकीर्द तशी वादग्रस्त राहिली, कधी राजकीय वक्तव्यांमुळे तर कधी कौटुंबिक वादात त्यांच्या नावाची चर्चा समाज माध्यमांवर रंगत राहिली. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर संजना या कन्नड मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करत आहेत.

कन्नड विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता :संजना जाधव यांना हर्षवर्धन जाधव यांना आव्हान देण्यासाठी दुसऱ्या बाजूने तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी संजना जाधव यांनी काढलेल्या शेतकरी मोर्चात हर्षवर्धन जाधव यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर आता बीआरएस पक्षात प्रवेश करून ते पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक तसेच कन्नड विधानसभा निवडणूक रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :Raj Thackeray on Dargah : माहिमचे अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम राज ठाकरेंनी केले उघड; म्हणाले, '.....तर गणपती मंदिर उभारू'

Last Updated : Mar 23, 2023, 4:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details