महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे पराभूत; मात्र पॅनल विजयी - Aurangabad District Bank elections

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर भाजपशी हात मिळवणी करत पॅनल उभे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बँक निवडणुकीत राजकीय आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले असताना निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हरिभाऊ बागडे
हरिभाऊ बागडे

By

Published : Mar 22, 2021, 5:25 PM IST

Updated : Mar 22, 2021, 6:10 PM IST

औरंगाबाद - सर्वांचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुभवी असलेले शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र, बागडे यांचे पॅनल विजयी झाले आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे पराभूत
बागडे यांच्या पॅनलला बहुमतशेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले आहे. पॅनलचा 15 जागेवर विजय मिळाला आहे. विरोधी पँनल डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांच्या शेतकरी सहकार बँक पँनलला चार जागेवर विजयी मिळाला आहे. अपक्ष बिगरशेती मतदार संघातील अभिषेक जैस्वाल यांनी अनपेक्षित विजय मिळवत सर्वांना धक्का दिला आहे. दिग्गजांमध्ये मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, जावेद पटेल, जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगांवकर, अभिषेक जैस्वाल, सुहास सिरसाट, मनोज राठोड, अर्जुन गाडे, अप्पासाहेब पाटील हे विजयी झाले आहे. तर हरिभाऊ बागडे, अभिषेक देशमुख, शहानवाज खान यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. बँकेचा अध्यक्ष नितीन पाटील होऊ शकतात, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

हेही वाचा-अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी


दानवे आणि चव्हाण पहिल्यांदाच विजयी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर भाजपशी हात मिळवणी करत पॅनल उभे केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बँक निवडणुकीत राजकीय आरोप - प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले असताना निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनुभवी असलेल्या हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला असला तरी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. त्यामुळे अंबादास दानवे पुन्हा वरचढ ठरल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा-अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Last Updated : Mar 22, 2021, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details