महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gulabrao Patil On Sanjay Raut : 2000 कोटी कुठे ठेवले संजय राऊत यांनी सांगावे, गुलाबराव पाटील यांचे टीकास्त्र - एकनाथ शिंदे

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटातील नेत्यांकडून त्यावर व्व्ध प्रतिक्रीया देण्यात येत आहेत. त्यावर आता गुलाबराव पाटील यांनी राऊतांच्या त्या विधानाची खल्ली उडवली आहे.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटील

By

Published : Feb 20, 2023, 2:53 PM IST

औरंगाबाद :धनुष्यबाणाची डील 2000 कोटी रुपयांत झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला होता. डिल झालेले पैसे कुठे ठेवले हा प्रश्न राऊतांनाच विचारा? असा टोला त्यांनी लगावला. तसेच ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असे विचारल्यावर त्यांनी जाऊद्या असे म्हणत खिल्ली उडवली आहे. तसेच, त्यांना आम्ही काही गांभिर्याने घेत नाहीत असही ते यावेळी म्हणाले आहेत.


संजय राऊत यांनी केलं होतं धक्कादायक विधान : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार टीका सुरू झाली. त्यात संजय राऊत यांनी धनुष्यबाणाची डील दोन हजार कोटी रुपयांना झाल्याचे धक्कादायक विधान रविवारी केले. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते आक्रमकपणे टीका करत आहेत. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील टीका करत आलेले पैसे कुठे ठेवले? त्यात किती नोटा आहेत? हे राउतांनी सांगावे असे विधान औरंगाबाद विमानतळावर केले.


त्यांना न्यायालयात जाऊ द्या : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत विधान केले. असा निर्णय द्यायचा होता तर आम्हाला कशासाठी इतके कष्ट करायला लावले अशी टिका त्यांनी केली होती. इतकच नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे त्यांनी सांगितले. त्यानंतर रविवारी सोमवारी निवडणूक आयोगा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असे त्यांनी सांगितले. त्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टीका केली आहे. त्यांना कुठे जायचे ते जाऊ द्या, असे हसत वक्तव्य करत पुढील बोलणे टाळले. गुलाबराव पाटील मराठवाडा दौऱ्यावर असून औरंगाबाद आणि जालना येथे पाणीपुरवठा बाबत ते बैठक घेणार आहेत. नागरिकांसाठी योग्य नियोजन करू, तसेच या दौऱ्यात पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्ररी आहेत त्या ऐकून निकाली काढण्यात येतील तसेच जे काम करत नसतील त्यांना सुट्टी देण्यात येईल असेही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे शहरात ठाकरे गट निष्ठावंत मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाटील यांच्या शहरातील हजेरीत ते काय टीका करतील याकडे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

हेही वाचा :Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी सेना भवनात बोलावली राज्यभरातील जिल्हाप्रमुखांची तातडीची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details