औरंगाबाद- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (दि. 26 जानेवारी) मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानात पार पडले. यावेळी सादर करण्यात आलेल्या पोलीस कवायतीने सर्वांचे लक्षकेंद्रीत केले.
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादेत मंत्री देसाईंच्या हस्ते ध्वजारोहण, लक्षवेधी ठरले पोलीस संचलन - ध्वजारोहण
पोलीस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानात ध्वजारोहण पार पडले. यावेळी सादर करण्यात आलेल्या पोलीस कवायतीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. यावेळी पोलीस दलातील विविध विभागाने प्रत्यक्षिके सादर केली. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले, संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे, उप आयुक्त मीना मकवणा यांसह अनेक लोक प्रतिनिधी, अधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.
हेही वाचा - बनावट कागदपत्रांद्वारे चोरलेल्या ट्रकचे हस्तांतर, सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल