औरंगाबाद - महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील १२ वे ज्योर्तीलिंग असलेल्या घृष्णेश्वर शिवमंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो. महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात प्रतिवर्षी भाविकांची महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. हर हर महादेवचा गजर परिसरात घुमतो. संपूर्ण वातावरण भक्तिमय होत. मात्र कोरोनाचे सावट पाहता मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला आहे.
महाशिवरात्रीला यंदा वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर राहणार बंद; भाविकांचा हिरमोड
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी लाखो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल होतात. महाशिवरात्रिला शिवाचे दर्शन व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील विविध भागातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होतात. मात्र यंदा मंदिर बंद असल्याने यंदा भाविकांना महाशिवरात्रीला भगवान शंकराचं दर्शन घेणं शक्य होणार नाही.
महादेवाचे एकूण बारा ज्योतिर्लिंग देशात आहेत. या ज्योतिर्लिंगाच दर्शन करण्यासाठी भाविक यात्रा करतात. औरंगाबादचे घृष्णेश्वर त्यापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग. जोपर्यंत घृष्णेश्वर याचे दर्शन घेत नाही तोपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही, अशी अख्यायिका आहे. त्यामुळेच भाविक ज्योतिर्लिंगाच्या यात्रा पूर्ण करण्यासाठी येत असतात. औरंगाबादसह राज्यातून आणि देशातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.
मंदिराची जलधारा पूर्वाभिमुख-
इतर प्रमुख ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर मंदिरात काही फरक आहेत. पहिल्या अकरा ज्योतिर्लिंगाची जलधारा पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा मारणे शक्य होत नाही. मात्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षणा घातली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी लाखो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल होतात. महाशिवरात्रिला शिवाचे दर्शन व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील विविध भागातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होतात. मात्र यंदा मंदिर बंद असल्याने यंदा भाविकांना महाशिवरात्रीला भगवान शंकराचं दर्शन घेणं शक्य होणार नाही.