औरंगाबाद - लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाने आमदार इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर इम्तियाज जलील विमानाने हैदराबादहून औरंगाबादेत दाखल झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मतदार आपल्या बाजूने असल्याने, आपण नक्कीच विजय मिळवू, असा विश्वास आमदार जलील यांनी यावेळी बोलून दाखवला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज यांचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत - लोकसभा निवडणूक
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत....कार्यकर्त्यांची औरंगाबाद विमानतळावर गर्दी...मतदार आपल्या बाजूनं असल्यानं विजय आपलाच, जलील यांचा विश्वास...
एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढवावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांची होती. बहुजन वंचित आघाडीची पहिली सभा औरंगाबादमध्ये पार पडली होती. त्यानंतर बहुजन वंचित आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नावाला अनेकांनी विरोध केला. औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाची मोठी ताकद आहे, त्यामुळे औरंगाबादेत एमआयएमने निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी धरून ठेवली.
यासंदर्भात हैदराबादमध्ये बैठक झाली. यावेळी औरंगाबाद लोकसभा निवडणूक एमआयएम लढवणार, अशी घोषणा करण्यात आली. या बैठकीत आमदार इम्तियाज जलील यांचे नाव एक मुखाने उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर इम्तियाज जलील हे हैदराबादहून विमानाने औरंगाबादमध्ये दाखल झाले. तेव्हा औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. माझ्यामागे मतदार असल्याने विजय निश्चित मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.