महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

covid- 19 : कन्नड तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप - kannad tehsil ration

यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती कार्ड 23 किलो गहू व 12 किलो तांदूळ याप्रमाणे 118 मेट्रीक टन गहू व ६२ मेट्रीक टन तांदूळ. तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 619 मेट्रीक टन गहू व 413 मेट्रीक टन तांदूळ वितरीत करण्यात आले आहे. एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 273 मेट्रीक टन गहू व 182मेट्रीक टन तांदूळ माहे एप्रिल 2020 साठी वितरीत करण्यात आले आहे.

Grain Delivered by 239 ration shop in kannad tehsil
covid- 19 : कन्नड तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप

By

Published : Apr 15, 2020, 8:45 PM IST

कन्नड(औरंगाबाद) - राज्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून जनतेला अन्यधान्य पुरवठा करण्यात येत आहे. कन्नड तालुक्यातही शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार तालुक्यातील 239 रास्त भाव दुकानांतर्गत अन्नधान्य वितरीत करण्यात आले आहे.

यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती कार्ड 23 किलो गहू व 12 किलो तांदूळ याप्रमाणे 118 मेट्रीक टन गहू व ६२ मेट्रीक टन तांदूळ. तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 619 मेट्रीक टन गहू व 413 मेट्रीक टन तांदूळ वितरीत करण्यात आले आहे. एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी प्रती व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 273 मेट्रीक टन गहू व 182मेट्रीक टन तांदूळ माहे एप्रिल 2020 साठी वितरीत करण्यात आले आहे.

तालुक्यात आतापर्यंत 89.61 टक्के शिधा वाटप झाला असून अन्न धान्य वितरीत करतांना सोशल डिस्टन्सिगचे पालन केलेले आहे. त्या अनुषंगाने तहसिलदार श्री संजय वारकड, नायब तहसीलदार शेख हारून अजीज, सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सर्व 239 दुकानांची तपासणी केली. लाभार्थीना नियमाप्रमाणे धान्य वाटप होत असल्याची खात्री करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ प्रतिमाह याप्रमाणे माहे एप्रिल 2020 साठी मोफत तांदळाचे वाटप रास्त भाव दुकानदार मार्फत वितरीत करण्यात येत असून सदर योजनेसाठी अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी 113 मेट्रीक टन तांदूळ व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी 1023 मेट्रीक टन तांदूळ वितरीत करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत एपीएल शेतकरी व उर्वरित शिधापत्रिका धारक या योजनेसाठी पात्र नाहीत तथापि कम्युनिटी किचन अंतर्गत तालुक्यात 25 दानशूर व्यक्ती / संस्था याचेमार्फत अंदाजे 5000 कुटुंबासाठी किराणा सामान, जेवणाची व्यवस्था, साबण,सॅनिटायझर, मास्क ई वैद्यकीय वस्तूंचे वितरण करण्यात आलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details