औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा मंगळवार आज पासून (१६ मार्च) सुरू झाल्या आहे. यासाठी २१२ परीक्षा केंद्रावर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय दिले आहेत. ऑफलाइन परीक्षा देणार्यांसाठी 'होम सेंटर' आहे, तर ऑनलाइन परीक्षा मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे दिली जात आहे. परीक्षा केंद्रांवर 'कोविड'संदर्भात योग्य काळजी घेऊन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून पदवी परीक्षेला सुरुवात; २१२ परीक्षा केंद्रावर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी - पदवी परीक्षेला औरंगाबादेत सुरुवात
पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा आज पासून सुरू झाल्या आहे. यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तर काही विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पर्याय निवडला आहे. ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यापीठातर्फे त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बामू
आजपासून पदवी परीक्षेला सुरुवात..