औरंगाबादकोरोना काळाच्या दोन वर्षांमध्ये अनेक सण सोहळे साजरे करण्यात निर्बंध होते. मात्र आता परिस्थिती आटोक्यात आल्याने पुन्हा एकदा उत्साहाने सोहळे साजरे केले जात आहेत. गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी Dahihandi सोहळ्यात गोविंदा पथक Govinda team कसून सराव करत आहेत तर यंदा मोठ्या प्रमाणात सोहळा पार पडणार असून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दहीहंडी फुटेल असा विश्वास आयोजकांनी केला आहे Dahihandi celebration in Aurangabad .
स्वाभिमान क्रीडा मंडळ येथे आगळेवेगळा सोहळाशहरातील सिडको Aurangabad Cidco भागात असणारी स्वाभिमान क्रीडा मंडळाची दहीहंडी नेहमीच विशेष असते. अनेक ठिकाणी सिने अभिनेते किंवा सेलिब्रिटी यांना निमंत्रित करून सोहळा साजरा केला जातो. मात्र गोविंदा हाच सोहळ्याचा मुख्य सेलिब्रिटी असे समजून कॅनॉट भागात सोहळा साजरा केला जातो. साहसी क्रीडा प्रकार असलेल्या प्रकाराला महत्व प्राप्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता कोणतेही सेलेब्रिटी बोलवत नाहीत. शहरात सर्वात पहिले सुरू होणारी दहीहंडी म्हणून स्वाभिमान क्रीडा मंडळाची असे दहीहंडीकडे पाहिले जाते. सायंकाळी सहानंतर शहरात दहीहंडी फोडण्याच्या सोहळ्याला सुरुवात होते. मात्र गोविंदा पथकांची सुरक्षा आणि नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता, दुपारी या दहीहंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात येते अशी माहिती स्वाभिमान क्रीडा मंडळाचे Swabhiman Sports Board अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी दिली आहे.