महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'समृद्धी' झाली तिसऱ्यांदा आई, 5 बछड्यांना दिला जन्म - Aurangabad District News Update

सिद्धार्थ प्राणी संग्राहालयातून आनंदाची बातमी समोर आली आहे. समृद्धी या पिवळ्या वाघिणीने सात बछड्यांना जन्म दिला आहे. आतापर्यंत समृद्धीने तीन वेळा बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांची काळजी वाघीण समृध्दी ही स्वतः घेत असून, बछड्यांना दूध पाजत आहे. वाघिणीची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

Good news at Siddhartha Zoo
'समृद्धी' झाली तिसऱ्यांदा आई

By

Published : Dec 25, 2020, 7:21 PM IST

Updated : Dec 25, 2020, 7:53 PM IST

औरंगाबाद -सिद्धार्थ प्राणी संग्राहालयातून आनंदाची बातमी समोर आली आहे. समृद्धी या पिवळ्या वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिला आहे. आतापर्यंत समृद्धीने तीन वेळा बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांची काळजी वाघीण समृध्दी ही स्वतः घेत असून, बछड्यांना दूध पाजत आहे. वाघिणीची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

बछड्यांची सीसीटीव्हीच्या निगराणीत देखभाल

वाघिण व पिलांची देखरेख प्राणिसंग्राहालयातील पशुवैद्यकीय विभागामार्फत केली जात आहे. आई व बछडे या दोघांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी हिटर लावण्यात आले आहे. तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वाघिणीच्या व बछड्यांच्या देखभालीसाठी २४ तास केअर टेकर ठेवण्यात आलेले आहेत. वाघिणीच्या पिंजऱ्यात केअर टेकर शिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

'समृद्धी' झाली तिसऱ्यांदा आई

समृद्धी झाली तिसऱ्यांदा आई

उद्यानामध्ये सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीपासूनदि.१२.११.२०१६ रोजी १ नर आणि २ मादी अशा एकूण ३ बछड्यांचा जन्म झाला होता. तसेच दि.२६.०४.२०१९ रोजी एक नर आणि ३ मादी अशा एकूण 4 बछड्यांचा जन्म झाला. आता समृद्धी तिसऱ्यांदा आई झाली आहे.

Last Updated : Dec 25, 2020, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details