महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देणे अधिकाऱ्यांना पडले महागात - प्लास्टिक बंदी

औरंगाबादचे महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय रुजू होताच त्यांनी प्लास्टिक बंदी सक्तीने राबवायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी मनपा उपयुक्तांना तर दुसऱ्या दिवशी नगरसेविकेला प्लास्टिक वापरल्या प्रकरणी त्यांनी दंड लावला होता. त्यात आता पर्यावरण मंत्री शहरात असताना प्लास्टिक बंदी नियम पाळली गेली.

chief-minister-uddhav-thackeray
मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छा देणे अधिकाऱ्यांना पडले महागात

By

Published : Jan 10, 2020, 11:19 PM IST

Updated : Jan 11, 2020, 12:00 AM IST

मुंबई -मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतसाठी मराठवाडा विभागातील अधिकारी स्वागतासाठी आले होते. स्वागत करत असताना आणलेल्या पुष्पगुच्छाला प्लास्टिक गुंडाळले असल्याचे लक्षात आल्यावर मनपा आयुक्तांनी थेट अधिकाऱ्यांनाच दंड आकारला आहे.

दंडाची पावती

हेही वाचा - चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून मनीलाँड्रिगप्रकरणी कारवाई

युती सरकार मध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली होती. महाआघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मराठवाड्यात आले असताना नियमांचे पालन केल गेल्याने अनेकांनी कारवाईचे कौतुक केले.

औरंगाबादचे महानगर पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय रुजू होताच त्यांनी प्लास्टिक बंदी सक्तीने राबवायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी मनपा उपयुक्तांना तर दुसऱ्या दिवशी नगरसेविकेला प्लास्टिक वापरल्या प्रकरणी त्यांनी दंड लावला होता. त्यात आता पर्यावरण मंत्री शहरात असताना प्लास्टिक बंदी नियम पाळली गेली.

दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी औरंगाबादेतील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी अनेकांनी पुष्पगुच्छे तसेच पुस्तके आणली होती. त्यातील काही कार्यकर्त्यांच्या बुकेमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करण्यात आला होता. ही बाब निदर्शनास येताच महानगरपालिका आयुक्त पांडे यांनी जालना आणि लातूर येथील दोन कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला. आयुक्तासोबत असलेले स्वीय सहाय्यक मरापे यांनी रमेश पाटील (लातूर) आणि मनीष श्रीवास्तव (जालना) यांच्याकडून हा दंड वसूल करत त्यांना दंडाच्या पावत्या दिल्या.

हेही वाचा - लंकेश हत्या प्रकरण: हृषीकेश देवडीकर औरंगाबादेत चालवायचा पतंजलीचे दुकान

Last Updated : Jan 11, 2020, 12:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details