औरंगाबाद-येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याचे कळताच काही संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला आहे. यात रुग्णाच्या 30 ते 40 नातेवाईकांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांचा घाटी रुग्णालयात राडा; 30 ते 40 जणांनी केली तोडफोड - घाटी रुग्णालय तोडफोड बातमी
उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याचे कळताच काही संतप्त नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या औषध विभागातील आयसीयू वॉर्डात राडा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाटीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-वॉलमार्ट इंडियाकडून ५६ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'
उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याचे कळताच काही संतप्त नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या औषध विभागातील आयसीयू वॉर्डात राडा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाटीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बाहेर उभे इतर नातेवाईक देखील आयसीयूत दाखल झाले. त्यांनी देखील आरडाओरड करीत सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली. यात परिचारिका कक्ष, तसेच औषध विभागाचा दरवाजा तोडत राडा घातला. याप्रकरणी घाटी प्रशासनाच्यावतीने बेगमपुरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.