महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctors Strike In Aurangabad घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही उपसले संपाचे हत्यार, अत्यावश्यक सेवा मात्र सुरू - घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी ( Doctors Strike In Aurangabad ) आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होत आहे. घाटी रुग्णालयात ( Ghati Hospital OPD Closed ) डॉक्टरांच्या संपामुळे ओपीडी बंद पडली आहे. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू असेल अशी माहिती ( OPD Closed In Aurangabad Due To Doctors Strike ) रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Doctors Strike In Aurangabad
घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर

By

Published : Jan 2, 2023, 3:24 PM IST

औरंगाबाद -नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी, राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Ghati Hospital OPD Closed ) व रुग्णालयासह औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर ( Doctors Strike In Aurangabad ) गेले. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळित होणार आहे. मात्र रुग्णांची गैरसोय ( OPD Closed In Aurangabad Due To Doctors Strike ) होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहायक, सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असेल, अशी माहिती मार्ड तर्फे देण्यात आली आहे.

पाच मागण्यांसाठी संपवरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदनिर्मितीच्या जागा भरण्यासंदर्भातील प्रस्ताव मार्गी लावावा, वसतिगृहांच्या दुरुस्ती करून आवश्यक सोयी-सुविधा द्याव्यात, महागाई भत्ता, वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी एका वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील मार्डचे निवासी डॉक्टर ( MARD Doctor Strike In Aurangabad ) संपावर गेले.

घाटी रुग्णालयात चारशे डॉक्टर संपात सहभागीऔरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात घाटी ( Ghati Hospital Aurangabad ) येथे 300 ते 400 निवासी डॉक्टर संपात सहभागी झाल्याची माहिती मार्ड तर्फे देण्यात आली आहे. ओपीडी बंद करण्यात आलेले असून तातडीची रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आली आहे. आश्वासन खूप झाली, आज संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर हा संप बेमुदत सुरू राहील असा इशारा मार्ड तर्फे देण्यात आला आहे. तर या संपामुळे काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया मात्र पूर्ण केल्या जातील, अशी माहिती घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details