महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gangapur News : गंगापुरात माणुसकीचे दर्शन! 'एक हाथ मदतीचा' या उपक्रमातून अप्लास्टिक ॲनिमियाग्रस्त चिमुकल्यासाठी उभारला एक लाखाचा निधी - उपचारासाठी २९ लाख रुपये खर्च

Gangapur News प्लास्टिक ॲनिमिया आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी गंगापूर शहरातील तरुणाईनं पुढाकार घेतलाय. चिमुकल्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून सर्व मित्रांनी एकत्र येत गंगापूरमध्ये आठ तास पायी फिरत मदत फेरी काढलीय आणि उपचारासाठी एक लाख, अठरा हजार, तीनशे साठ रुपये मदत निधी जमा केलीये.

Gangapur News
गंगापुरात माणुसकीचे दर्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 8:04 PM IST

गंगापूर(छत्रपती संभाजी नगर) Gangapur :नुकतंच गंगापुरात माणुसकीचं दर्शन बघायला मिळालं असून अप्लास्टिक ॲनिमिया आजारानं ग्रासलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी गंगापूर शहरातील तरुणाईनं पुढाकार घेतलाय. सामाजिक बांधिलकी जपत चिमुकल्याच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. यात व्यापारी, फेरीवाले, डॉक्टर, नागरिक यांनी स्वखुशीनं संतोष लवांड यांच्याकडं निधी जमा केलाय. या चिमुकल्याच्या उपचारासाठी एक लाख, अठरा हजार, तीनशे साठ रुपये मदत निधी जमा झालाय.

चिमुकल्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत



उपचारासाठी २९ लाख रुपये खर्च : समर्थ संतोष लावंड या मुलाला अप्लास्टिक ॲनिमिया हा दुर्मीळ आजारानं ग्रासलय. या आजाराच्या उपचारासाठी जवळपास 29 लाख रुपये एवढा खर्च येणार असून सध्या त्याच्यावर मुंबई येथील वाडीया हॉस्पीटलमध्ये उपचार सुरूय. कुटूंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं समर्थच्या उपचाराचा खर्च कुटुंबीयांना पेलावणारा नाही. कुटुंबीयांकडून, लोकप्रतिनिधींकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मागणी करण्यात आलीय.



मदतीसाठी तरुणाईचा पुढाकार : समर्थच्या उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून सर्व मित्रांनी एकत्र येत गंगापूरमध्ये आठ तास पायी फिरत मदत फेरी काढली. तसेच शहरातील प्रत्येक चौकातील व्यापारी, फेरीवाले, डॉक्टर, नागरिक, छोटे दुकानदार, टपरीचालक यांच्याकडं जाऊन स्वखुशीनं समर्थच्या उपचारासाठी मदत निधी जमा केलाय.



मदतीसाठी यांनी घेतले परिश्रम : हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जगताप, राहुल वानखेडे, राकेश कळसकर, नवनाथ कानडे, अख्तर सय्यद, गुलाम शहा, हनीफ बागवान,स्वप्नील गायकवाड, वैभव खाजेकर, फैसल बासोलान, नीलेश शेळके, सुमित साबणे, सागर शेजवळ, अजय बत्तिसे, राहुल साळवे, पप्पू टिके, आकाश बुचडे, गणेश राजपूत, अमर राजपूत, ओम शिर्के, सागर घोडके, आकाश मोरे, अमोल म्हसरुप, सलीम शहा, इरफान शेख, संदीप कनगरे, अर्जून कराळे, अशपाक सय्यद, अजय दहातोंडे,मनोज राऊत, सोनू भवार, आकाश बारहाते, रामेश्वर म्हस्के , करण खोमणे, अनिकेत काळे, केतन आरसुळ अविनाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतलेय.

हेही वाचा -

  1. Ghati Hospital Death Case : नांदेडनंतर संभाजीनगरच्या 'घाटी' रुग्णालयात मृत्यूचं तांडव, २४ तासात १८ रुग्ण दगावले
  2. Dewai Cooperative Society Scam : आदर्शनंतर आणखी एका पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटाळा, फरार झालेल्या संचालकावर गुन्हा दाखल
  3. IATO Conference : राज्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या 38 राष्ट्रीय परिषदेला सुरुवात, पर्यटनमंत्र्यांनी फिरविली पाठ

ABOUT THE AUTHOR

...view details