औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जळीत प्रकरणी समितीने अहवाल सादर केला असून, तीन प्राध्यापक तसेच एका निरीक्षकावर ठपका ठेवण्यात आला आहे. समीतीने चार पानांचा अहवाल कुलगुरू प्रमोद येवले यांना सादर केला असून त्यात काही बाबी नमूद करत यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. मयत गजानन मुंडे, पूजा साळवे यांच्यातील वादाची कल्पना असूनही त्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली नाही, आले आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संशोधक मैत्रिणीसोबत घेत स्वतः घेतले जाळून : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संशोधन करणाऱ्या गजानन मुंडे यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय विज्ञान प्रयोग शाळेत स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले होते. त्यानंतर त्याची मैत्रीण संशोधक विद्यार्थ्यांनी पूजा साळवे हिला प्राध्यापकाच्या केबिनमध्ये मिठी मारली होती. या घटनेत दोघे भीषण भाजले होते. गजानन मुंडे 98 टक्के भाजला होता तर, पूजा साळवे 55 टक्के भाजली होती. मुंडे यांचा मृत्यू 21 नोव्हेबर रोजी तर, पूजाचा मृत्यू 15 जानेवारीला घाटीत झाला होता. याप्रकरणी पूजाच्या नातेवाईकांनी सखोल चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी तपास अहवाल दिला असून, त्यामध्ये तीन प्राध्यापक एक अधिकारी तसेच शासकीय विज्ञान संस्थेतील एका प्राध्यापकाला या वादाची माहिती असल्याचे समीतीने दिलेल्या अवहालात म्हटले आहे.
पोलिसांनी तपासले पुरावे :गजानन मुंडे, पूजा साळवे या दोघांबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. दोघे प्रेमी युगुल असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मिळालेली माहिती चुकीची असल्याचा दावा पूजेच्या कुटुंबियांनी केला होता. पूजा हुशार विद्यार्थिनी असून गजानन तिच्या मागे लागला होता. तिने याबाबत वारंवार तक्रार देखील दिल्या आहेत असे कुटुंबीयांनी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी एक वर्षाचा कालावधीतील मुंडे यांचा फोनचा तपशील तपासला. यात अनेक वेळा दोघांचा संभाषण झाल्याचे दिसले. दोघांचे एकत्रित फोटो देखील समोर आले. मात्र, पूजाकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्ये गजानन त्रास देत असल्याचे पुरावे सापडले. त्यात गजाननच्या आई-वडिलांसोबत झालेल्या संभाषणाचा एक पुरावा पोलिसांना मिळाला त्यावरून पोलिसांनी आपला अहवाल सादर केला.