औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी औरंगाबादमध्ये शिवसेनेच्यावतीने मोफत शिवभोजन दिले जात आहे. संचारबंदी संपेपर्यंत भोजन मोफतच देण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणारे लोक उपाशी राहू नये यासाठी ही उपाय योजना केली आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानका समोर ही प्राथमिक व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणीही मोफत शिवभोजन देण्यात येईल, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.