औरंगाबाद -लॉकडाऊनच्या काळात तळीरामांची लूट करण्याचा प्रकार होत आहेत. सर्वत्र दारूची दुकानं महिनाभरापासून बंद असल्याने ऑनलाईन दारू विक्रीच्या जाहिरातीखाली ही फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खबरदार..! ऑनलाईन दारूच्या नावावर होत आहे फसवणूक - दारू विक्री
सर्वत्र दारूची दुकानं महिनाभरापासून बंद असल्याने ऑनलाईन दारू विक्रीच्या जाहिरातीखाली ही फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दारूची दुकानं बंद असल्याने तळीरामांना आपल्या व्यसनावर नियंत्रण ठेवावे लागत आहे. काळ्या बाजारात दारूची विक्री जास्त दराने होत असल्याने दारू विकत घेणेही अनेकांना शक्य होत नाही. त्यात सोशल मीडियावर ऑनलाईन दारू विक्रीच्या जाहिराती केल्या जात आहेत. दारू घरपोहोच देण्याचे आमीष दाखवून ऑनलाईन पद्धतीने पैसे खात्यावर जमा करण्यास सांगितले जात आहे. यातच अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले.
अशा पद्धतीने दारू विक्रीला परवानगी नाही. त्यामुळे हे सर्व प्रकार फक्त फसवणूक करण्यासाठी केले जात आहेत. अशा जाहिरातींना बळी पडू नका. याबाबत पोलीस विभागाने सोशल मीडियावर नागरिकांना आवाहन केले आहे.