महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुंतवणुकीच्या आमिषाने ग्रंथपालाला १२ लाखाचा गंडा - aurangabad

कैलास पवार यांनी हाडे यांना भागिदार होण्याची ऑफर दिली.  यावेळी अनिल यालाही पगारावर न ठेवता त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव असल्याने त्याला नफ्यामध्ये कायदेशीर भागीदार करण्याचे हाडे यांनी ठरवले. दरम्यान, अनिलचे रेकॉर्ड चांगले नसल्याचे पवार यांनी सांगूनही हाडे यांनी विश्वास ठेवला.

गुंतवणुकीच्या आमिषाने ग्रंथपालाला १२ लाखाचा गंडा

By

Published : Apr 14, 2019, 1:23 PM IST

औरंगाबाद- टुर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत जास्त परताव्याचे आश्वासन देत ओळखीच्याच व्यक्तीने ग्रंथपालाची ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समेार आला आहे. मोहन हाडे, ५०, रा. शहानुरवाडी यांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या अनिल नवनाथ गिरी, रा. श्रीकृष्ण नगर याच्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मोहन हाडे सेंट फ्रान्सीस हायस्कूलमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करतात. अनिल गिरी व त्यांची जुनी ओळख होती. अनिलने त्यांना काम शोधण्यासाठी विनंती केल्याने हाडे यांनी त्याला त्यांचे मित्र कैलास पवार यांच्याकडे स्वामी ट्रॅव्हल्सवर काम देण्यासाठी सांगितले. अनिल चांगले काम करत असल्याने पवार यांनी हाडे यांना भागिदार होण्याची ऑफर दिली. यावेळी अनिल यालाही पगारावर न ठेवता त्याचा त्या क्षेत्रातील अनुभव असल्याने त्याला नफ्यामध्ये कायदेशीर भागीदार करण्याचे हाडे यांनी ठरवले. दरम्यान, अनिलचे रेकॉर्ड चांगले नसल्याचे पवार यांनी सांगूनही हाडे यांनी विश्वास ठेवला.

त्यानंतर दुकान भाड्याने घेऊन हाडे यांनी गुंतवणूक केली. त्यानंतर शाळेच्या सहली व इतर प्रवासाच्या कामासाठी पैसे गुंतवून तीघांमध्ये ३३.३३ टक्के भागदारी वाटून घेण्याचे ठरले. व्यवसाय सुरू झाल्यावर सहलीच्या कामासंदर्भात व्यक्तीला दोघेही गिरीकडे पाठवत होते. सहलीची आलेली रक्कम बँकेत भरणे अपेक्षित असताना गिरी ने त्याच्या वैयक्तिक खात्यावर जमा केले. असे केल्याने जीएसटी कमी लागेल, असे त्याने दोघांना सांगितले. अशा प्रकारे त्याने प्रत्येक व्यवहारात घाोटाळा करत पैशांमध्ये अफरातफर करण्यास सुरूवात केली.

हा प्रकार लक्षात येइपर्यंत भागीदारीचे ठरलेली रक्कम अनिले न दिलेली ११ लाख ८६ हजार ६४१ रुपयांपर्यंत पोहोचली होती. जुन, २०१८ ते नोव्हेंबर, २०१८ दरम्यान गिरीने हा प्रकार केला. पैसे देण्याचे आश्वासन देत त्याने काही महिन्यानंतर त्यांना दोघांविरोधात खोट्या तक्रारी देण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला. अखेर हाडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे जवाहरनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर पुढिल तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details