औरंगाबाद- शहरात आज कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या 44 वर पोहोचली आहे. वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेचे कारण ठरत आहे. सद्यस्थितीत 17 रुग्ण उपचार घेत आहेत.
औरंगाबादेत एकाच दिवशी आढळले कोरोनाचे ४ रुग्ण - औरंगाबाद अपडेट्स
औरंगाबादमध्ये समतानगर सध्या शहरातील हॉटस्पॉट ठरत आहे. समतानगर येथे आतापर्यंत 8 तर आसेफिया कॉलनीत नऊ रुग्ण आढळून आले आहेत. एका 28 वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आल्याने अवघ्या पाच दिवसात समतानगर येथे रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे.

शुक्रवारी भीमनगर भावसिंगपुरा येथील 27 वर्षीय युवकाला, आसेफिया कॉलनीत 38 वर्षीय इसमास, समतानगर भागात 24 वर्षीय युवकाला आणि 37 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. भीमनगर, भावसिंगपुरा येथील महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याच समोर आले. अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकीकडे कोरोनाचे उपचार घेणाऱ्या सहा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर त्याच दिवशी चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.