महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

औरंगाबाद-जालना रोडवर गाढेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीने (MH 28 AN 3620) रोडच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलर (MH 40 BJ 8111) मागच्या बाजूने धडकली.

aurngabad
औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

By

Published : Jan 31, 2020, 10:12 AM IST

Updated : Jan 31, 2020, 1:52 PM IST

औरंगाबाद - देवदर्शनाहून घरी परतत असताना औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाडजवळ क्रूझर गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादहून सिंदखेडराजाकडे जाणारी क्रूझर गाडी उभ्या ट्रेलरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी (दि. 31) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रूझरमधील चार जण जागीच ठार झाले, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; 4 भाविक ठार, 9 गंभीर

काशिनाथ देवराव मेहत्रे (वय 62), रवी बबन जाधव (वय 32 दोघेही रा.नशिराबाद ता.शिंदखेडराजा), संगीता गणेश बुंदे (वय 45 रा.तांदूळवाडी ता.सिंदखेडराजा), ऋषीधर देवराव तिडके (वय 55 रा.गोंदेगाव जालना), अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर या अपगातातील जखमींना औरंगाबाद शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

औरंगाबाद-जालना रोडवर गाढेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीने (MH 28 AN 3620) रोडच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलर (MH 40 BJ 8111) मागच्या बाजूने धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 4 जण जागीच ठार झाले, तर इतर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील रहिवासी असून ते इगतपुरी येथून देवदर्शन करून गावी परतत असताना हा अपघात झाला.

मृतामध्ये ज्येष्ठ पत्रकाराचा समावेश

सिंदखेडराजा येथील ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ मेहेत्रे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मेहेत्रे हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत होते. तसेच शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळो-वेळी आवाज उठवला होता. माळी सोयरिक संकेत स्थळाच्या माध्यमातून शेकडो युवक युवतींचे विवाह त्यांनी जुळवले होते. या दुर्दैवी अपघातात त्यांचा मुत्यू झाल्यामुळे शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Last Updated : Jan 31, 2020, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details