औरंगाबाद- पैठण येथील शासकीय रुग्णालयातील परिचारकाला (ब्रदर) कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीची बैठक घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. परिचारकाच्या संपर्कात येणाऱ्या 81 संशयितांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाधित परिचारक औरंगाबादेतील रहिवासी असून शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावण्यासाठी औरंगाबादवरुन ये-जा करायचा. शासकीय कर्मचाऱ्यांना पैठण शहरातच राहून कर्तव्यावर असणे प्रशासनाने सक्तीचे केले होते. त्यामुळे शहरातील नाथ महाराज यांच्या मंदिरातील भक्त निवास याठिकाणी तो राहत होता.