औरंगाबाद-जिल्ह्यात रविवारी सकाळी 42 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1540 झाली आहे. जिल्ह्यात 976 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 70 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 494 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रविवारी सकाळी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1), गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1), नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1),किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1), जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1), अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), अन्य (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 18 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.