औरंगाबाद - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी महाराष्ट्रातील औरंगाबादमधील वेरुळ लेण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी या लेण्या पाहून आनंद व्यक्त केला आहे. वेरुळच्या लेण्या पाहणे हा एक अद्भुत अनुभव असल्याचे त्या म्हणाल्या. हिलरी क्लिंटन पुढील प्रवासासाठी आज औरंगाबाद येथून रवाना झाल्या आहेत.
हिलरी यांनी पाहिल्या चार लेण्या - हिलरी क्लिंटन यांनी बुधवारी वेरूळ लेणीसह घृष्णेश्वर मंदिरात भेट दिली. लेणी परिसरात अडीच तास त्यांनी पाहणी केली. जगाला भुरळ घालणाऱ्या वेरूळ लेणीने हिलरी क्लिंटन यांनाही भुरळ घातली. साकारलेला कलाविष्कार पाहून अद्भुत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. क्लिंटन या औरंगाबाद दौऱ्यावर आल्या होत्या.
हिलरी यांचा औरंगाबाद दौरा - क्विंटन या दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या होत्या. सात फेब्रुवारीला अहमदाबाद येथून खासगी विमानाने त्या औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्या होत्या, तेथून ध्यान फार्म्स सहाजतपूर तालुका खुलताबाद येथे त्या मुक्कामी होत्या. आठ फेब्रुवारीला घुश्मेश्वर मंदिर व वेरूळ लेणी येथे त्यांनी भेट दिली. त्यानंतर पुन्हा ध्यान फार्म्स शहाजपुर येथे मुक्काम करून त्या 9 फेब्रुवारीला आज पुढील ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
लेणीचे केले कौतुक -वेरूळ लेणीने अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हेनरी क्लिंटन यांना देखील भुरळ घातली. बुधवारी सकाळी त्या वेरूळ लेणी परिसरात दाखल झाल्या. लेणी क्रमांक 10, 16, 32 आणि 33 या चार लेण्या त्यांनी पाहिल्या. जवळपास अडीच तास त्या लेणी परिसरात होत्या. हिलरी यांनी त्या काळात केलेल्या अविष्काराची पाहणी केली व कौतुकही केले. औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जैन, बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा दर्शन दाखवणारी एकमेव लेणी आहे.